केंद्र सरकारच्या कामामुळे शरद पवारांचे मनपरिवर्तन होईल – बावनकुळे

0
26

 

अमरावती -भारतीय जनता पार्टी राज्यात 288 जागेवर पूर्ण ताकतीने तयारी करत आहे. देशात मागच्या वेळेपेक्षा जास्त बहुमत आम्हाला मिळेल. लवकरच केंद्र सरकारच्या कारभारावर शरद पवार यांचे मनपरिवर्तन होईल असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. केंद्र सरकारच्या 9 वर्षाच्या कामावर अजित पवारांसोबत शरद पवार व सुप्रिया सुळे यांचे देखील मनपरिवर्तन होईल.शरद पवार व सुप्रिया सुळे हे मोदींच्या नेतृत्वाला मदत करतील असे जनसंपर्क अभियानांतर्गत बोलताना ते म्हणाले.
खासदार नवनीत राणा यांनी कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी असे आवाहन करीत अमरावतीत खासदार व्हावा, आमचा 2024 चा आग्रह असेल यावर भर दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाण्याच्या बाहेर प्रभाव नाही असे म्हणणे योग्य नाही. २१ शतकात भारताच्या भक्कम निर्मितीची क्षमता फक्त मोदींमध्ये आहे. हे अजित पवारांनी सांगितले आहे. महाराष्ट्रात आम्ही महायुतीच्या 45 पेक्षा जास्त लोकसभेच्या जागा जिंकू आणि विधानसभेत 200 पेक्षा जास्त जागा जिंकू. कुठल्याही पक्षात काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली असेल तर लोकशाहीने त्यांना तो दिलेला अधिकार आहे. कोणताही शेतकरी अडचणीत येणार नाही याची तयारी केंद्र सरकारने केली आ

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा