
भंडारा BHNDARA – भंडारा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिह्यातील TUMSAR तुमसर तालुक्यातील येरली येथील ADIWASI ASHRAM SCHOOL आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. विद्यार्थ्यांना शासकीय रुग्णालय, तुमसर येथे उपचारासाठी आणण्यात आले. विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असून त्यांची परिस्थिती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. येरली आश्रम शाळेतील बाधित 43 विद्यार्थ्यांपैकी 20 तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात तर 23 जिल्हा रुग्णालय भंडारा येथे विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असून त्या सर्वांची प्रकृत्ती स्थिर आहे. त्यांना आज सायंकाळपर्यंत रुग्णालयातून डिस्चार्ज होण्याची शक्यता धीरज लांबट, वैद्यकिय अधिक्षक उपजिल्हा रुग्णालय तुमसर यांनी बोलून दाखविली.