उपमुख्यमंत्री होण्यास अजित पवार कायम तयार- माजी राज्यपाल कोश्यारी

0
34

मुंबई- अजित पवारांच्या विचारांमध्ये स्पष्टता आहे. त्यांना कितीही वेळा उपमुख्यमंत्री होण्यास सांगितले तरी ते कायम तयार असतात, असे मत माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अजित पवारांबद्दल व्यक्त केलेय. एका मुलाखतीत बोलताना त्यांनी अजित पवारांबद्दल अत्यंत परखड मत मांडले.
कोश्यारी म्हणाले, मला कधीकधी अजित पवारांची दया येते. ते अतिशय हुशार आहेत. अजित पवारांकडे चांगला जनाधार आहे. संघटनेत त्यांची ताकद आहे. त्यामुळे अनेक आमदार आणि खासदार त्यांच्याबरोबर असतात. प्रत्येकांचं एक व्यक्तिमत्व असतं. शरद पवार देशातील ज्येष्ठ नेते आहेत. ते माझ्यापेक्षा आठ-दहा महिन्यांनी मोठे आहेत, त्यामुळे त्यांचा आदर करणे स्वाभाविक आहे. ते उत्तम राजकारणी आहेत, असेही ते म्हणाले.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा