गोंदिया जिल्ह्यातील धान घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी मुंबईचे पथक

0
26

गोंदिया – गोंदिया जिल्ह्यात सध्या धान खरेदीचा घोटाळा हा मोठ्या प्रमाणात गाजत असून अनेक धान खरेदी संस्था या घोटाळ्यामध्ये अलिप्त असल्याचे समोर आले आहे. राईस मिल सुद्धा तांदूळ घोटाळ्यामध्ये सहभागी असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे. धान खरेदी संस्था यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी सध्या गोंदिया जिल्ह्यात मुंबई येथील 6 लोकांचे भरारी पथक आले असून आता ते कोणती कारवाई करणार याकडे संपूर्ण जिल्ह्याच्या नजरा लागून आहेत. नुकतेच गोंदिया जिल्ह्यात रब्बी हंगामामध्ये श्रीराम अटल अभिनव धान सोसायटीद्वारा 433 शेतकऱ्यांनी धान्य खरेदी केली होती. या संस्थेने 15 हजार 996 क्विंटल धान शेतकऱ्यांकडून खरेदी केली. याची किमंत रुपये 3 कोटी 26 लाख रकमेचे धान केंद्रावर खरेदी केली होती. परंतु संस्थेने जिल्हा मार्केटिंग फेडरेशन द्वारा दिलेल्या टीओ अनुसार राइस मिलर्स ला धान पुरवठा केलाच नाही. त्यामुळेच जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचे अधिकारी यांनी या खरेदी केंद्रावरच्या विरोधात गोंदिया शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे. जिल्हाधिकारी यांच्या समन्वयाने एक समिती स्थापन करून ग्रामसेवक, तलाठी यांच्या मार्फत शेतकऱ्यांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष तपासणी करून त्यांच्या सातबारा नुसार अहवाल तयार करून जिल्हाधिकारी यांना पाठवलेला आहे. आणि जिल्हाधिकाऱ्यांनी हा अहवाल नागरिक पुरवठा अधिकारी सचिवालय यांना पाठविला असून लवकरच मंत्रालयाकडून शेतकऱ्यांचे चुकारे देण्याचे निर्णय होणार, सध्या गोंदिया जिल्ह्यात मुंबई येथील भरारी पथकाची दाखल झाल असून हे भरारी पथक सर्व धान संस्थानाची चौकशी करत आहे. या भरारी पथकामध्ये मुंबईतील सहा अधिकारी असून ते सर्व संस्थांच्या चौकशी करणार तसेच धान खरेदी केंद्र चालवणाऱ्या संचालक मंडळाच्या मालमत्तेची चौकशी करणार आहेत. त्यांच्या अहवाला नुसार कारवाई करण्याचे निर्णय जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अधिकारी यांनी घेतला आहे. तरी मात्र अद्यापही सहा संस्था जिल्ह्यामध्ये समावेशअसून त्यावर सुद्धा कारवाही करण्याचे संकेत देण्यात आले आहे. या वर्षी रब्बी हंगामामध्ये 14 लाख 16 हजार 554 सेंटर ने धान्याची खरेदी केली, असून 200 कोटी 97 हजार 097 रुपयाचे चुकारे शेतकऱ्यांना देण्यात आले. मात्र अद्यापही 13 कोटी 47 लक्ष 34 हजार रुपयांचे शेतकऱ्यांचे चुकारे अद्याप प्रलंबित असल्याचे जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांनी सांगितले.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा