पं.स. स्तरावर घंटानाद व धरणे, जिल्हा स्तरावर बेमुदत साखळी उपोषण -जिल्हा कोअर बैठकीत निर्णय

0
429

नागपूर – जिल्हा कोअर कमेटीची विशेष सभा नुकतीच संपन्न झाली.अशोक दगडे अध्यक्ष, म.रा.उ.श्रे.मु.अ.व सेवानिवृत्त प्राथमिक महासभा,नागपूर अध्यक्षतेखाली झालेल्या
ऑक्टोबरमध्ये आंदोलनाची घोषणा करण्यात आली. या सभेत प्रामुख्याने चार विषयावर चर्चा करून निर्णय घेण्यात आला. यात २०२१ पासून आजपावेतो सेवानिवृत्त शिक्षकांना अंशराशीकरण मूल्य, सेवा उपदान आणि गृपविमा यांची राशी आजपर्यंत मिळालेली नसल्याने पुढील कार्यवाही निश्चित करण्यासाठी सर्व पंचायत समिती स्तरावर एक दिवसीय घंटानाद व धरणे आणि जिल्हा स्तरावर २७ ऑक्टोंबरपासून शृंखला उपोषण करण्याचे ठरले आहे.
निवड श्रेणीत पात्र अपात्र सेवानिवृत्त संबंधी चर्चा करून निकष पूर्ण करणाऱ्यांना अपात्र ठरविण्यात आल्यास कोणत्या कारणे अपात्र ठरविले ते तपासून व आपण त्या निकषात बसत असल्यास आवश्यक कागदपत्रे पंचायत समितीला सादर करण्याचा निर्णय सभेत पारित करण्यात आला. प्रत्येक पंचायत समिती स्तरावर सभापती यांना निवेदन देऊन त्यांच्या मासिक सभेच्या प्रोसिडींगला सेवानिवृत्त शिक्षकांच्या सेवा उपदान, अंशराशीकरण मूल्य व गृपविमा शासन स्तरावरून लवकरात लवकर काढण्याचा ठराव घेण्याची विनंती करण्यात यावी. जेणेकरून ती ठराव कापी जिल्हा परिषद नागपूरला पोहचेल व जिल्हा परिषद आपल्या स्तरावर त्यांची नोंद करून शासन दरबारी पाठवेल.या पद्धतीने . कार्य झाल्यास शासनाला तात्काळ दखल घ्यावी लागेल आणि आपल्या उचित मागण्या तातडीने पूर्ण होतील असा निर्णय घेण्यात आला.३० जूनला सेवानिवृत्त झालेल्यापैकी १०८ सेवानिवृत्तांनी न्यायालयीन लढा जिंकल्यानंतर ३ आगस्ट रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी प्राथमिक, जिल्हा परिषद नागपूर यांना व गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती सर्व यांना १ जुलैची काल्पनिक वेतनवाढ लागू करण्यासंबंधी न्यायालयीन आदेशासह निवेदन देऊनही पंचायत समिती स्तरावरून संबंधित शिक्षकांचा 1 जुलैचा एका वेतनवाढीचा प्रस्ताव तयार करण्यात आला नाही. संबंधित पंचायत समितीत विचारणा केली असता जिल्हा परिषदेच्या आदेशाविना आम्ही काहीही करू शकत नाही असे स्पष्ट सांगण्यात आले. या समस्याचे निवारणार्थ मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी प्राथमिक, जिल्हा परिषद यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन देऊन चर्चा करण्याचे सर्वांनुमते ठरले. या सभेनंतर जिल्हा कार्यकारणी सरचिटणीस दिपक सावलकर, विनोद राऊत ,सुधाकर भुरके ,जयदेव टाले , दीपक तिडके ,संजय भेंडे,साहेबराव ठाकरे, जीवन डफरे,साहेबराव काळबांडे, मधुकर फरतोडे यांच्यासह अनेक सेवानिवृत्त यांनी जिल्हा परिषद गाठून मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी प्राथमिक, जिल्हा परिषद नागपूर यांची प्रत्यक्ष भेट घेतली. 3 ऑगस्टला निवेदन दिल्यानंतर अद्याप कुठल्याच प्रकारची कार्यवाही केलेली नाही. याकरिता विचारणा केली सोमवार मंगळवार पर्यंत कार्यवाहीचे पत्र पंचायत समिती ला पोहचेल असे शिक्षणाधिकारी यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा संघटनेचे अध्यक्ष अशोक दगडे,सरचिटणीस दीपक सावलकर, साहेबराव ठाकरे,विनोद राऊत, सुधाकर भुरके,जयदेव टाले,शेषराव खंडार,श्रीमती सरिता किंमतकर,जयश्री कावळे, ,सुनिता दामले,किशोर चौधरी,दीपक तिडके, अशोक तपासे,हरिराम चांदूरकर,विजय बेले,श्रीराम वाघे,वसंता लांडे,जी.कडसकर,हरेराम चांदे,दामोदर झाडे,संजयभेंडे,मुरलीधर कामडे,जे.डफरे,रामभाऊ तभाणे,मालती आगरकर, भास्कर मेडजोंगे,मधुकर फरतोडे, साहेबराव काळबांडे,एकनाथ मांडवे, विलास येरखेडे,प्रभाकर धरणे,पांडूरंग बुचे,दीपक वंजारी, सुरेश समर्थ,एस.भेंडे,चित्तरंजन गाडवे,रमेश बिरनवार,ज्ञानेश्वर वानखेडे आदींची यावेळी उपस्थिती होती.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा