देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांसोबत साजरे करण्यात आले रक्षाबंधन

0
30

बुलढाणा BULDHANA – देशाचे संरक्षण करणारे सैनिक हे आपल्या घरापासून नेहमीच दूर असतात. त्यांना कुठल्याही प्रकारचे सण व उत्सव आपल्या परिवारासोबत साजरे करता येत नाही. घरी असलेल्या बहिणी सोबत त्यांना रक्षाबंधनही साजरी करता येत नाही. अशातच या सैनिकांना आपल्या परिवारासोबत व बहिणींसोबत हा क्षण अनुभवता यावा याकरिता खामगाव शहरातील इनरव्हील क्लब, शीबिल्ड्स संस्था, जेसीआई जय अम्बे, जेसीआई खामगांव सिटी, अखिल भारतीय महेश्वरी महिला संगठन  Innerwheel Club of Khamgaon City, Shibuilds Sanstha, JCI Jai Ambe, JCI Khamgaon City, All India Maheshwari Women’s Organization यांच्यावतीने खामगाव शहरातील एनसीसी बटालियनमध्ये सैनिकांसोबत रक्षाबंधन साजरा करण्यात आला. जे सैनिक देशाचे रक्षण करतात. त्यांना राखी बांधण्याचा हा आमच्यासाठी भाग्याचा क्षण आहे. जेव्हा सैनिक त्यांच्या घरापासून दूर देशाच्या रक्षणासाठी कार्यरत असतो तेव्हा त्यांच्या कुटूंबियासोबत आम्ही सर्व आहोत असा विश्वास सैनिकांच्या मनात निर्माण होत आहे. यावेळी महिलांनी सैनिकांना ओवाळून राखी बांधून पेढा भरवला. रुमाल व नारळ भेट म्हणून दिले. निरोप घेताना भारतातील विविध भागांतील असलेल्या या सैनिक बंधूनी सर्वांना खूप प्रेमाने ओवळणीची भेटवस्तूही दिली. यावेळी काही सैनिकांनी सांगितले की, रक्षाबंधनचा सोहळा साजरा करत असताना आयसीसी बटालियन मधील सैनिकांना आपल्या कुटूंबात असल्यासारखे वाटले. कुटूंबापासून खूप दूर असल्यामुळे आलेल्या सर्व महिलांना भेटून बहीणच भेटल्याचा आनंद झाल्याचे त्यांच्या चेहऱ्यावर यावेळी दिसून आले. या कार्यक्रमांमध्ये देशभक्तीपर गीतांचे नृत्य सुद्धा यावेळी बच्चे कंपनीकडून सादर करण्यात आले.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा