चंद्रावरील त्या ठिकाणाला नाव मिळालं शिवशक्ती पॉईंट

0
40

बंगळुरु- Bangalore-Chandrayaan 3 चांद्रयान ३ मोहिम यशस्वी झाल्यानंतर पंतप्रधान Narendra Modi नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सकाळी  ISRO इस्रोच्या बंगळुरु येथील मुख्यालयास भेट देऊन वैज्ञानिकांची पाठ थोपटली. हे मानवतेचे यश असल्याचे सांगताना मोदी यांनी एक महत्वाची घोषणा केली. चंद्राच्या ज्या भागावर चांद्रयान-३ उतरलं, ते ठिकाण शिवशक्ती या नावाने ओळखले जाईल, अशी घोषणा त्यांनी केली.

पंतप्रधान मोदी म्हणाले, अंतराळ मोहिमेच्या टच डाऊन पॉईंटला नाव देण्याची वैज्ञानिक परंपरा आहे. ज्या भागावर चांद्रयान उतरले, तो आता शिवशक्तीच्या नावानं ओळखला जाणार आहे. शिवमध्ये मानवतेच्या कल्याणाचा संकल्प आहे आणि शक्तीपासून त्या संकल्पांना पूर्ण करण्यासाठी सामर्थ्य मिळते. चंद्रावरील शिवशक्ती पाँइंट हिमालयापासून ते कन्याकुमारी जोडल्याचा बोध करत आहे. यावेळी चांद्रयान-२ देखील चंद्रावर उतरलं होतं. त्या ठिकाणाला तिरंगा असं नाव देण्यात येत असल्याचे मोदी यांनी सांगितले. यावेळी बंगळुरुमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो देखील पार पडला. त्याला लोकांनी प्रचंड गर्दी केली होती.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा