चालत्या कारने घेतला पेट

0
46

(SOLAPUR ); कार जळून खाक

मोहोळहुन – सोलापूरकडे जाणाऱ्या महामार्गावर चालत्या कारने अचानक पेट घेतल्यामुळे कार जळून खाक झाली. मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे कोणतीही जिवीतहानी झाली नाही .श्रीकांत कांबळे रा. माढा . जि. सोलापूर हे माढ्याहुन मोहोळमार्गे सोलापूरला स्वताच्या पेट्रोल कारने IKON ( MH 12 CK 8244) जात असताना अचानक कोळेगांव पाटीजवळ हॉटेल सुगरणसमोर त्यांना बॉनेटमधुन धुर येत असे दिसले .तात्काळ त्यांनी रस्त्याच्या कडेला कार थांबविली व कारच्या खाली उतरले . तो पर्यत बॉनेटमधुन अधिक धुर येत त्यातुन आगीचे लोट दिसु लागले . कांबळे यांनी आसपास थांबलेल्या एक दोन नागरिकांच्या मदतीने जवळच्या एका शेतकऱ्याच्या वस्तीवरून बादलीने पाणी आणुन आग विझविण्याच्या प्रयत्न केला. पण तोपर्यत आगीने उग्र रूप धारण करून कार भस्मसात झाली.

 

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा