मध्य रेल्वेच्या स्वास्थ्य केंद्रात लागली भीषण आग

0
35

 

(Nagpur)नागपूरच्या (Ajani Railway Colony)अजनी रेल्वे वसाहतीमध्ये असलेलं मध्य रेल्वेच्या स्वास्थ्य केंद्रात लागलेल्या अचानक आगीच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. स्वास्थ्य केंद्राच्या मागील बाजूस असलेल्या खिडकीमधून आग दिसू लागल्यांने खळबळ उडाली आहे. आत मध्ये सगळीकडे जुने लाकडी फर्निचर असल्यामुळे आगिने पेट घेत आग पसरली. आग लागलेल्या भागात असलेले कागदपत्र जळाले असून इतर साहित्य जळून खाक झाले आहे. तीन अग्निशामक बंबच्या साह्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. यात प्लास्टिक सिलिंग जळाले असून रविवार असल्यानं आणि आग सकाळी लागल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. प्राथमिक अंदाजानुसार आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी. यात जीवितहानी झाली नसली तरी एरवी मोठ्या संख्येने रुग्ण या ठिकाणी असतात.

 

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा