कस्टम अधिकाऱ्याने केली तलावात आत्महत्या

0
50

(Mumbai)मुंबई – नवी मुंबईतील तळोजा तुरुंगाच्या समोरील तलावात काल संध्याकाळी एका मृतदेह पाण्यावर तरंगताना काही तेथील नागरिकांना दिसला नागरिकांनी घटनेची माहिती हद्दितील खारघर पोलिसांना दिली. पोलीस अग्निशामक दलाचे जवान घेऊन घटनास्थळी दाखल होत,सदर मृतदेहाला ताब्यात घेत,मृतदेह रुग्णालयात पाठवला. बाजूला एक कार उभी दिसली प्रथमदर्शनी ती कार मयत व्यक्तीची असल्याचे दिसून येताच कारची पोलिसांनी झडती घेतली असता त्यात सुसाईड नोट सह इतर कागदपत्र आणि मोबाईल सापडला,ज्यात शेवटी अनेक मिस कॉल पप्पा या नावाने आले होते. फोनवरच्या मिस कॉलवर पोलिसांनी घटनेची माहिती दिली असता मयत व्यक्तीचे नातेवाईक खारघर पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यांनी दिलेल्या माहिती नुसार मयत व्यक्तीचे नाव मयंक सिंग असून त्याचे वय 38 आहे. तर मयत व्यक्ती उरण येथील कस्टम अधिकारी असल्याचे निष्पन्न झाले. पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

 

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा