
सोमवार, २८ ऑगस्ट रोजी आयोजन
(Nagpur)नागपूर, दिनांक २५ ऑगस्ट
(Vidarbha Sahitya Sangh)विदर्भ साहित्य संघ व हनुमाननगर सार्वजनिक वाचनालय आणि ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भ साहित्य संघाच्या गणेश व्याख्यानमालेचे आयोजन, सोमवार दिनांक २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.३० वाजता हनुमाननगरातील गृहिणी समाजाच्या सभागृहात केले आहे. व्याख्यनमालेचे प्रमुख वक्ता अमरावतीचे (Prof. Dr. Arvind Deshmukh)प्रा.डॉ. अरविंद देशमुख असून ते “कृतार्थतेचा जीवनमंत्र” या विषयावर आपले विचार व्यक्त करतील. (Vidarbha Sahitya Sangh President Pradeep Date)विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते समारंभाच्या अध्यक्षस्थानी असून वाचनालयाचे (President Prof. Satish Dande) अध्यक्ष प्रा. सतीश दंडे यांची विशेष उपस्थिती राहील. या व्याख्यानास साहित्य रसिकांनी अगत्याने उपस्थित राहावे असे आवाहन विदर्भ साहित्य संघ आणि हनुमाननगर सार्वजनिक वाचनालय यांच्या कार्यकारी मंडळाने केले आहे.
https://youtu.be/honc0SfT4os?si=1ti9bqlNUJFk1nCr
शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा