
– बावनकुळे(Bawankule)
(Gondia)गोंदिया– 2024 पर्यंत पक्ष प्रवेशाचे बॉम्बब्लास्ट होताना दिसतील. येणाऱ्या दिवसात महाविकास आघाडीमध्ये अस्वस्थता दिसेल आणि (Narendra Modi)नरेंद्र मोदी आणि (Devendra Fadnavis)देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात (BJP)भारतीय जनता पक्षच निवडणूक जिंकेल.(Sharad Pawar)शरद पवार हे भाजपामध्ये येतील असं मी कधीच म्हटलं नाही. त्यांनी जे वक्तव्य केलं होतं की, अजित पवार हे आमचेच नेते आहेत जर मग अजित पवारांनी भाजपासोबत येण्याची भूमिका स्वीकारली तर अजित पवार हे राष्ट्रवादीचे नेते आहेत तर नेत्यांनी स्वीकारलेली भूमिका ही आपणास मान्य असायला पाहिजे असे मी म्हटलेलं आहे. माझ्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढण्यात आला. ज्याप्रमाणे अजित पवार यांचे मतपरिवर्तन झाले. आज ना उद्या शरद पवारांचे सुद्धा मतपरिवर्तन होऊ शकते असं वक्तव्य मी केलं.
शरद पवार यांनी मला मूर्ख म्हटलं परंतु ते वरिष्ठ नेते आहेत, त्यांच्याबद्दल मी काही वक्तव्य करणार नाही. शरद पवार यांनी महाराष्ट्रातील सगळे उद्योग हे गुजरात मध्ये नेण्याचा आरोप केला आहे त्यावर बोलताना भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे की हे निवडणुकी करिता मांडलेली भूमिका आहे. महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये श्वेतपत्रिका काढली जेवढे उद्योग महाविकास आघाडीच्या काळात गेलेले आहेत ते यावर बोलायला कोणीही तयार नाही. अजित पवार मुख्यमंत्री होतील असे कार्यकर्ते आणि नेत्यांचे म्हणणे आहे यावर बोलताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की प्रत्येक पक्षाच्या नेत्याला असं वाटते की आपल्या पक्षाच्या नेता हा मुख्यमंत्री व्हावा परंतु आमच्या वरिष्ठ नेत्यांनी यापूर्वीच सर्वांना सांगितलय की शिवसेनेचे एकनाथ शिंदेचे मुख्यमंत्री राहतील . आम्हाला सुद्धा वाटते की मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस व्हावे राष्ट्रवादीला सुद्धा वाटते की अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत त्याचप्रमाणे काँग्रेसला सुद्धा वाटते की नाना पटोले, बाबासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार अशी मुख्यमंत्रीपदासाठी खूप मोठी लिस्ट आहे .मात्र आज आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच आहेत
असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
