नितीन देसाईंवर स्टुडिओसाठी ठाकरेंचा दबाव-नितेश राणे

0
27

मुंबई- प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येप्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह ठाकरे कुटुंबियांवर गंभीर आरोप केले आहेत. देसाई यांनी त्यांचा स्टुडिओ विकत द्यावा, म्हणून त्यांना धमक्या देण्यात आल्याचा आरोप नितेश राणे यांनी केला आहे. (BJP MLA Nitesh Rane)
आमदार राणे म्हणाले की, नितीन देसाई हे एक चांगला व्यक्ती होते. ते फार मेहनती होते, माझे वैयक्तिक फार चांगले संबंध होते. पण देशाला आणि महाराष्ट्राला कळले पाहिजे की, त्यांनी स्टुडिओ विकत द्यावा, असा कोणाचा दबाव त्यांच्यावर होता? तर माझ्या माहितीनुसार उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांचा होता. एनडी स्टुडिओ आम्हाला विका, अशा धमक्या देखील मातोश्रीशी संबंधित माणसाने नितीन देसाई यांना दिल्या होत्या, असा आरोप देखील यावेळी केला.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा