तिरंगायन’ देशभक्‍तीपर संगीताचा कार्यक्रम आज 29 ऑगस्‍ट रोजी

0
30

नागपूर, 28 ऑगस्‍ट
अमृत प्रतिष्ठान, नागपूर निर्मित ” तिरंगायन” हा देशभक्‍तीपर संगीताचा कार्यक्रम आज, मंगळवार, २९ ऑगस्ट,२०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता वसंतराव देशपांडे सभागृह, सिव्हिल लाइन्स येथे होत आहे.
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक विभागातर्फे आयोजित या कार्यक्रमात ‘सारे जहाँ से अच्छा हिन्दूस्तां हमारा’ व डॉ. उपेंद्र कोठेकर यांनी अटलबिहारी वाजपेयी यांची अविस्मरणीय हिंदी कविता ‘ हिंदू तनमन हिंदू जीवन’ यांचे मराठी रुपांतरण केलेली यांची रचना तसेच, इतर प्रेरणादायी देशभक्ती गीते सादर होतील. कार्यक्रमाचे संगीत मोरेश्वर निस्ताने यांचे असून संगीत संयोजन महेंद्र ढोले यांचे आहे. अवंती काटे व सचिन डोंगरे नृत्‍य सादर करणार असून दृकश्राव्य चलचित्र मनोज पिदडी यांचे राहील. कार्यक्रमाचे निवेदन डॉ. मनोज साल्पेकर करणार आहेत. कार्यक्रम नि:शुल्‍क असून मोठ्या संख्‍येने उपस्‍थ‍ित राहून आस्‍वाद घ्‍यावा, असे आवाहन सांस्‍कृतिक कार्य विभागाचे प्रधान सच‍िव विकास खारगे व संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा