उद्धव ठाकरेंना धनुष्यबाण पेलवला नाही – खा अनिल बोंडे यांची टीका

0
22

 

अमरावती – उद्धव ठाकरे यांनी भाषण केल्यानंतर राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर टीका केली जाते.उद्धव ठाकरेचे भाषण ऐकून खूप वाईट वाटलं , त्यांना धनुष्यबाण संभाळता आलाच नाही असं वक्तव्य भाजप खासदार अनिल बोंडे यांनी केले. ठाकरेंना धनुष्यबाण खऱ्या अर्थी पेलवला नाही, सांभाळता आला नाही. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली. ठाकरे सध्या सोनिया गांधींच्या विचारावरच बोलतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी धनुष्यबाण जपला. सध्याचे सरकार गोरगरिबांच्या घरी जाऊन योजना देत आहे. उद्धव ठाकरे कधी घराबाहेर पडले नाहीत. ठाकरेंनी ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून सरकार चालवलं त्यामुळे त्यांना त्याची किंमत कशी कळणार ? भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदा देशासाठी काम करावं लागतं त्यानंतर पक्षासाठी काम करावं लागतं, असा खोचक टोला देखील भाजप खासदार अनिल बोंडे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा