ब्रेकनंतर पंकजा मुंडे राज्याच्या धार्मिक यात्रेवर निघणार

0
28

छत्रपती संभाजीनगर-दोन महिन्यांचा राजकीय ब्रेक घेण्याची घोषणा करणाऱ्या भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे ब्रेकनंतर पुन्हा सक्रीय (BJP Leader Pankaja Munde) होत असून त्या आता पुढील महिन्यात शिवशक्ती यात्रा काढणार आहेत. या अकरा दिवसांच्या दौऱ्यात त्या राज्यभरातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील धार्मिक स्थळांना भेटी देऊन देवदर्शन करणार आहेत.
त्यांचा हा धार्मिक दौरा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून राज्यातल्या दहापेक्षा जास्त जिल्ह्यामध्ये होणार असून तो केवळ देवदर्शनासाठीच असणार आहे, असे पंकजा मुंडे यांनी जाहीर केले आहे. या दौऱ्यामध्ये त्या एकूण पाच हजार किलोमीटरचा प्रवास करणार असून सुरुवात छत्रपती संभाजीनगरमधील घृष्णेश्वर मंदिराच्या दर्शनापासून होणार आहे. नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांचा प्रामुख्याने समावेश राहणार आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा