ट्रकचालकासह भावाला तरुणांनी लुटले; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

0
28

गोंदिया – गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथे अमरावतीवरून व्यापाऱ्यांचे कृषी खत घेवून आलेल्या ट्रकमध्ये ट्रकचालक फिरोजखा गुलाम हुसेन खान वय 38 हा रात्री 10 वा. जेवण करीत होता. ट्रक मध्ये प्यायचे पाणी नसल्याने त्याने आपल्या भावाला पाणी आणण्याकरिता हॉटेलमध्ये पाठवले. तो जेवण करीत असताना अज्ञात चार युवक (वय 20 ते 25 वर्षाचे) हे ट्रक मध्ये घुसले त्यांच्या तोंडावर काळा रुमाल बांधलेला होता. त्यांनी चाकूचा धाक दाखवत, ट्रक चालकास तुझ्याजवळ किती पैसे आहेत? ते दे, नाहीतर तुझा मर्डर करू असे म्हटले.ट्रक चालकाने आपल्याजवळील 2800 रु. त्या युवकास दिले. दुसऱ्या युवकांनी त्याच्या जवळील चावी हिसकावली. ट्रक रायपूरच्या दिशेने नेले. भरेगाव फाट्याजवळून त्यांनी ट्रक देवरीच्या दिशेने पलटविला. त्यांनी ड्रायव्हरला आपल्या भावास फोन करायला सांगितला.ड्रायव्हरने त्याचा भाऊ यास फोन केला. तुझ्या जवळ आलेल्या व्यक्तींना तुझ्या जवळचे पैसे देवून टाक नाहीतर हे मला मारून टाकतील असे सांगितले. या चोरट्यांचे दुसरे चार साथीदार यांनी चालकाचा भाऊ नदीम खानला धमकावून त्याच्याजवळून 5500 रुपये हिसकावून नेले. नंतर ते चारही पांढऱ्या रंगाच्या कारने ट्रक जवळ येऊन आपल्या साथीदारांना घेऊन देवरीच्या दिशेने पळाले. ट्रक चालकाने या विषयीची तक्रार देवरी पोलीस स्टेशन येथे दाखल केली. देवरी पोलिसांनी चार दिवस विविध पथकांद्वारे याचा तपास करून या गुन्ह्यात सहभाग असणाऱ्या युवकांचा तपास लावून त्यांना अटक केली. या युवकांकडून मोबाईल आणि पांढऱ्या रंगाची कार जप्त केली अशी माहिती अशोक बनकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक, गोंदिया यांनी दिली.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा