शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा

0
27

 

अमरावती – शेतात वन्य प्राण्यांच्या होणाऱ्या हैदोसामुळे पिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांचा वेळीच बंदोबस्त करावा, अमरावती जिल्ह्यात पाऊस बेपत्ता झाल्याने कोरडा दुष्काळ जाहीर करावा, शेतातील पांदण रस्ते दुरुस्ती करावे, 24 तास शेतकऱ्यांना वीज पुरवठा करावा, यासाठी सामाजिक कार्यकर्ते नितीन कदम यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांनी एल्गार पुकारत अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी विविध लक्षवेधी फलकांच्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा