किशोरी पेडणेकरांवर अटकेची टांगती तलवार

0
36

मुंबई-मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर आता मुंबई उच्च न्यायालयाने देखील अटकपूर्व जामीनाचा अर्ज फेटाळल्याने माजी महापौर किशोर पेडणेकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. (Former Mayor Kishori Pednekar`s anticipatory bail rejected) कोरोनाच्या काळात मृतदेह ठेवण्यासाठी महापालिकेकडून झालेल्या बॅग खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात त्यांच्यासह ठेकेदार कंपनी वेदांताच्या संचालकांवर देखील गुन्हे दाखल झाले आहेत.
अटकेपासून संरक्षण मिळावे, यासाठी या पेडणेकर यांच्यासह वेदांताच्या संचालकांनी देखील अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज केला होता. पण त्यांचा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा