भाभा अणुसंशोधन केंद्रातील शास्त्रज्ञाची आत्महत्या

0
54

(Mumbai)मुंबई : मुंबईतील भाभा अणूसंशोधन केंद्रातील (बीएआरसी) 50 वर्षीय शास्त्रज्ञ मनीष सोमनाथ शर्मा यांनी सोमवारी राहत्या घरी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. (BARC Scientist Suicide) यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीष शर्मा यांनी सोमवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. हा प्रकार लक्षात आल्यावर पत्नीने शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांना रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

(Manish Sharma)मनीष शर्मा यांची पत्नी नितू यांनी पोलिसांना माहिती दिली की, त्यांचे पती डिप्रेशनने आजारी होती व त्यांच्यावर २००१ पासून उपचार सुरु होते. मनीष यांनी आत्महत्येपूर्वी पत्र लिहून ठेवले होते. ते ट्रॉम्बे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यात त्यांनी आत्महत्येसाठी कुठले कारण लिहून ठेवले आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

 

 

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा