
(MUMBAI)मुंबई : श्रावण महिन्यामध्ये हिरव्या भाज्यांच्या दरामध्ये घसरण झाली होती. मात्र सद्या ह्याच भाज्यांच्या दरात झपाट्याने वाढ होत असलेली पाहायला मिळत आहे, सद्या मेथीच्या भाजीची एक जुडी 25-30 रुपयांना विकली जात आहे. यापूर्वी हीच जुडी 10-15 रुपयांना विकली जात होती. मात्र बाजारात आवक कमी झाल्यामुळे मेथीच्या किंमतीमध्ये वाढ झाली असून येणाऱ्या काळात देखील अजून वाढ होऊन अधिकचा भाव मेथीच्या जुडीला मिळण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.
शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा