खासदार नवनीत राणा यांनी सुरक्षा रक्षकांसोबत साजरा केला रक्षाबंधन

0
26

 

अमरावती – अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना वाय प्लस सुरक्षा आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी 24 तास त्यांच्या सोबत पोलीस तैनात असतात. त्यामुळे नवनीत राणा यांनी अमरावतीत आपल्या निवासस्थानी त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांच्या हातावर राखी बांधत रक्षाबंधन सण साजरा केला. यावेळी अगदी भावाप्रमाणे सर्वांना ओवाळून त्यांनी सुरक्षा रक्षकांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा