
(MUMBAI )मुंबई-मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांड यांना सीबीआयकडून दिलासा मिळाला आहे. पांडे यांच्या कंपनीविरोधात दाखल प्रकरणात सीबीआयने न्यायालयात क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. (Former Mumbai Police Commissioner Sanjay Pandey) पांडे यांच्या आयसेक कंपनीविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. त्यांच्या कंपनीला एनएसईने लोकेशन घोटाळ्यात आरोपी बनवले होते. मात्र, या प्रकरणात पुरेसे पुरावे आढळून आले नसल्याने सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. या प्रकरणात संजय पांडे यांना अटकही झाली होती. मात्र, आता न्यायालय हा रिपोर्ट स्विकारते की नाही, याकडे लक्ष लागलेले आहे. या प्रकरणावर १४ सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे.