विरोधकांच्या बैठकीची मुंबईत जोरदार तयारी

0
38

(Mumbai)मुंबई : सत्ताधारी भाजपच्या विरोधात विरोधकांच्या इंडिया आघाडीची बैठक उद्या ३१ ऑगस्ट रोजी मुंबईत होत असून या बैठकीसाठी विरोधी पक्षाचे नेते मुंबईत दाखल होत आहेत. (Opposition Party Meeting, Mumbai) सांताक्रुजमधील ग्रॅंट हयात हॉटेलमध्ये होणाऱ्या या बैठकीसाठी जवळपास त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

बैठकीसाठी येणारे नेते व त्यांच्या सहकाऱ्यांसाठी सुमारे २८० खोल्या आरक्षित करण्यात आल्याची माहिती असून (Bihar Chief Minister Nitish Kumar)बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, (West Bengal Chief Minister Mamata Banerjee)पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, (Tamil Nadu Chief Minister M.K. Stalin)तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन, (Jharkhand Chief Minister Hemant Soren)झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, (Delhi Chief Minister Arvind Kejriwal,)दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, (Punjab Chief Minister Bhagwant Singh Man)पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंह मान या विद्यमान मुख्यमंत्र्यांसह (Congress leader Sonia Gandhi,)काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, (Lalu Prasad Yadav)लालु प्रसाद यादव, (Tejashwi Yadav)तेजस्वी यादव, (MP Rahul Gandhi)खासदार राहुल गांधी, (Congress president Mallikarjun Kharge)काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, (Sharad Pawar)शरद पवार, (Uddhav Thackeray)उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. नेत्यांच्या स्वागतासाठी काँग्रेसने हॉटेलच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात फ्लेक्स लावले आहेत. बैठकीसाठी राजदचे नेते लालू प्रसाद यादव, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, जम्मू-कश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुक अब्दुल्ला मुंबईत दाखल झाले आहेत.

 

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा