
सिरमकडून माहिती
(Pune)पुणे : डेंग्यू आणि मलेरियावर (Malaria & Dengue Vaccine) लस निर्मितीचे काम सुरु झाले आहे. डेंग्यूवरची लस वर्षभरात बाजारात येणार असल्याची घोषणा सीरम इन्स्टिट्यूटचे व्यवस्थापकीय संचालक सायरस पुनावाला यांनी केली आहे. डेंग्यू आणि मलेरियावर नियंत्रणासाठी यामुळे मोठी मदत मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. सिरमने कोव्हीड लस बनवून दिलासा दिला होता. मात्र, आता देशात सध्या डेंग्यू आणि मलेरियाची समस्या लक्षात घेऊन सिरमने त्यासाठी लस निर्मिती सुरु केली आहे. येत्या वर्षभरात डेंग्यूवरची लस बाजारात उपलब्ध होणार आहे मात्र मलेरियावरील लस बाजारात येण्यासाठी काही काळ वाट बघावी लागणार आहे, असल्याचे सांगण्यात आले.
(Punawala)पुनावाला यांनी सांगितले की, या लसीची नितांत गरज आहे. आफ्रिका आणि भारतात डेंग्यू आणि मलेरियाची साथ कायम येते. त्यावर ठोस उपाय होणे आवश्यक आहे. त्यामुळे आम्ही ही लस तयार करणार आहोत. या लसीमुळे डेंग्यूचे चारही प्रकार बरे होण्याची खात्री असेल.
