विरोधकांच्या बैठका केवळ नावापुरत्याच

0
41

– चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule)

(nagpur)नागपूर – इंडिया नावाच्या शब्दाला टिंब लावणे योग्य नाही, अनके पक्षाकडे एकमत नाही, हा प्रयोग नवीन नाही, यापूर्वीही असे प्रयोग झाले आहेत. देशात दिसलं पाहिजे म्हणून या बैठका घेत आहेत, मुळात त्यांच्या मागे जनता नाही, कमळाचे उमेदवार निवडून येणार आहेत असा दावा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
आमच्या सरकारमध्ये योग्य समनव्य असून तिन्ही नेत्यांना एकमेकांचे निर्णय माहित असले पाहिजे, निर्णय घेताना कळले पाहिजे, एखादा निर्णय होताना, चार लोकांनी घेतलेले निर्णय अधिक प्रभावी असेल, त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासासाठी हा महत्वाचा निर्णय असून त्या निर्णयाचे स्वागत करतो. त्यामुळे एखाद्या नेत्यांनी घेतलेल्या निर्णयात दुसरा नेता आणखी एडिशन करून त्याची निर्णयाची ताकदच वाढवेल असे अजितदादा पवार यांच्या संदर्भात प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
महायुती बैठक बाबत छेडले असता
NDA ची बैठक झाली आहे आणि आम्ही तिन्ही पक्षातील नेत्यांकडे किती जागा आहेत, या संदर्भात विभागानुसार बैठक घेणार आहे. INDIA फुलपाखरासारखे आले असून त्यांची नवीन बैठक आहे. आमच्या बैठकीत नवीन काही नाही यापूर्वीही आमच्या बैठका झालेल्या आहेत.

विरोधकांना भविष्यात विरोधी पक्ष नेता बनवता येईल एवढ्या सुद्धा जागा मिळणार नाहीत, सर्व्हेत ज्यांचे नाव येते, उद्धव ठाकरे यांना पंतप्रधानाचे डोहाळे लागले आहेत .त्यांच्यासाठी सर्व्हे केला आणि त्यांनीच उद्धव ठाकरे यांचं नाव दाखवलं. ते कुठून लोकसभा लढणार,मतदारसंघ निवडण्याचे निर्णय झाला नाही, यांच्यात एकमत होणार नाही, ठिणगी पडेल, मोदीच पंतप्रधान होणार, हे म्हणतात नंतर पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरवू हे जनतेला मान्य होणार नाही. काँग्रेसला विरोधीपक्ष नेताही बनवता येणार नाही. इंडिया आघाडीचे कुणीही संयोजक झाले तरी काहीही होणार नाही. हे नेते देशव्यापी काहीच करू शकणार नाही. देशाला उंची देणारे (Prime Minister Narendra Modi) पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. हे डब्यात राहणारे लोक आहे. किंचित सेना शिल्लक सेना तीन साडेतीन जिल्ह्यात प्रभाव असणारे, काही कोकणपुरते मर्यादित आहेत अशीही टीका केली.

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा