
(Gondia)गोंदिया – गोंदिया जिल्ह्यातील आमगाव लवरून शिवनी गाव जवळच आहे. मात्र, या गावी जात असताना पाटबंधारे विभागाच्या कालव्यावर पूल बांधला आहे. या पुलावरून वाहतूक करावी लागते. मात्र, हा पूल पन्नास वर्षे जुना असून सध्या या पुलाची अवस्था अतिशय बिकट झाली असून या पुलामधून आतील भागातून लोखंड बाहेर दिसायला लागले आहे. मुख्य म्हणजे याच पुलावरून आमगाव तालुकाशी संपर्क 15 ते 20 गावाचा होत असतो. एवढा महत्त्वाचा पूल असून सुद्धा अजूनही या पुलाच्या बांधकामाकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण याच मार्गावरून मोठ्या प्रमाणात दगडांची वाहतूक करणारे टीप्पर जात असतात. मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते. मात्र, हा पूल अत्यंत जीर्ण झाला असून या ठिकाणी केव्हाही मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच मार्गावरून अनेक विद्यार्थी हे तालुक्याच्या शाळेत येत असतात, त्यामुळे लवकरात लवकर हा पूल दुरुस्त करून नवीन बांधण्यात यावा अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहेत.