
(Amravti)अमरावती- अमरावतीच्या राजकमल चौकातील श्रीमंत दादासाहेब खापर्डे यांच्या खापर्डेवाड्याला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नातू (Ranjit Savarkar) रणजित सावरकर यांनी भेट देत पाहणी केली. या वाड्यात स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक, गजानन महाराज व नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे वास्तव्य राहिलेले आहे. या ठिकाणी असलेल्या ऐतिहासिक विहिरीत सर्वांनी आंघोळ देखील केली आहे. मात्र, सध्या अमरावतीतील या खापर्डे वाड्याची मोठी दुरवस्था झाली असून इमारत पडली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याकडे लक्ष देऊन ही इमारत विकत घेऊन त्यांला पुनर्जीवित करावे कारण हे राष्ट्रीय क्रांतीतिर्थ आहे. त्यामुळे ऐतिहासिक वारसा असलेल्या खापर्डे वाड्याची पुढच्या पिढीला प्रेरणा मिळावी, यासाठी शासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांनी केली आहे.