सरपंच सौ. प्रिया मनोज शरणागत यांचा मर्दानी’ म्हणून गौरव

0
72

तीरखेडी ग्रामपंचायत जिल्हा गोंदिया, ने केलेल्या संकल्पाचे अनुकरण इतरही ग्रामपंचायतने करुन ओबीसी शी बांधिलकी दाखवावी..

-राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चा तर्फे तीरखेडी ग्रामपंचायत चा विशेष गौरव

-भारतीय संविधान अनुच्छेद 46 संबधाने आपल्या राज्यात व गावात सामाजिक व आर्थिक मागासलेपणाचा सर्व्हेक्षण करण्याचा अधिकार.

देशात प्रथमच एखाद्या ग्रामपंचायत ने जातीनिहाय जनगणना करण्याचा एक ऐतिहासिक निर्णय केला आहे. पंचायत कायदा अंतर्गत आपल्या ग्राम पंचायत क्षेत्रात मागासवर्गीय घटकाच्या सामाजिक व आर्थिक विकास नियोजनासाठी असे सर्व्हेक्षण करण्याचा अधिकार आहे. व शिवाय राज्य सरकारला ही राज्य निदेशक तत्व 46 अंतर्गत समाजातील सामाजिक मागासवर्गीय घटका च्या कल्याण योजना करण्यासाठी असे सामाजिक आर्थिक सर्व्हेक्षण करण्याचा अधिकार आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्था मधिल ओबीसी चे राजकीय आरक्षण सुरक्षित करण्यासाठी माननीय सर्वोच्च न्यायालयाने ही ओबीसीचा इम्पीरीकल डाटा तयार करण्याचे निर्देश दिले होतेच. त्याच अंतर्गत महाराष्ट्रातील ग्रामपंचायत ने ओबीसी वर्गाचा डाटा तयार केला आहे. त्यामुळे तीरखेडी ग्रामपंचायत ने आपल्या ग्रामपंचायत मधील मागासवर्गीय घटका च्या विकासासाठी जाती निहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला. हा एक ग्रामपंचायत स्तरावरील विकास नियोजन संबधाचा क्रान्तीकारी निर्णय आहे. त्याचे राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चा ने स्वागत केले.
केन्द्रीय सरकारवर देशातील ओबीसी संघटना कडून जातीजनगणना करिता दबाव निर्माण झाला आहे. त्यावर प्रतिक्रिया देण्यासाठी म्हणून 2021 ची जनगणनाच अद्याप केन्द्रीय सरकारने केली नाही.
म्हणूनही तीरखेडी ग्रामपंचायत चा आपल्या ग्रामपंचायत मध्ये जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय एक राष्ट्रीय दखलपात्र कृति ठरली आहे.
याच कृति साठी राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चा तर्फे आज तीरखेडी ग्रामपंचायत चा सत्कार करण्यात आला. तसेच या निर्णयात महत्वाची भूमिका बजवणाऱ्या सरपंच श्रीमती सौ. प्रिया मनोज शरणागत यांना राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चा तर्फे मर्दानी’ म्हणून विशेष गौरव करण्यात आला.
या प्रसंगी बोलतांना राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चा चे मुख्यसंयोजक नितीन चौधरी यांनी इतरही ग्रामपंचायत ने या पद्धतीचा निर्णय करुन ओबीसी विकासात हातभार लावावा असे आवाहन केले.
यावेळी संघटनेचे प्रवक्ता अॅड अशोक यावले, उपाध्यक्ष कृष्णकान्त मोहोड , अरुण पाटमासे, महासचिव अस्लम खातमी हे उपस्थित होते.
तसेच यावेळी तीरखेडी ग्रामपंचायत चे सदस्य व जनता यांनीही यास संख्येने उपस्थित राहून सत्कारास प्रतिसाद

 

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा