
-सायरस पुनावाला (Cyrus Punawala)
(Pune)पुणे-राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आता निवृत्त व्हावे, (NCP President Sharad Pawar) असा सल्ला त्यांचे मित्र सायरस पुनावाला यांनी त्यांना दिला आहे. शरद पवारांकडे दोनदा पंतप्रधान होण्याची संधी होती. पण त्यांनी त्या संधी गमावल्या. ते अत्यंत हुशार व्यक्ति असून त्यांनी त्यांनी पंतप्रधान म्हणून देशाची चांगली सेवा केली असती. पंरतु त्यांच्या हातातून संधी निघून गेली, असेही सायरस पुनावाला एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले. सायरस पुनावाला हे शरद पवारांचे निकटचे मित्र मानले जातात.
आता जसे माझे वय वाढते आहे, तसेच त्यांचेही वाढते आहे. त्यामुळे त्यांनी आता निवृत्त व्हावे, असा सल्लाही त्यांनी पवारांना दिलाय. सायरस पुनावाला हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात.