विद्यापीठामध्ये आठ दिवसापासून आंदोलन सूरुच

0
38

 

(Amravati)अमरावती – (Sant Gadgebaba University, Amravati)अमरावतीच्या संत गाडगेबाबा विद्यापीठाने बीए, बीसीए, बी कॉम विद्यार्थ्यांना कॅरी ऑन लागू केला. मात्र इंजीनियरिंग बी फॉर्म आणि लॉ च्या विद्यार्थ्यांना कॅरी ऑन लागू केल्यामुळे विद्यार्थी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ मध्ये कॅरी ऑनच्या मागणीसाठी गेल्या आठ दिवसापासून ठिय्या आंदोलन सुरु आहे. काही विद्यार्थ्यांना डेंग्यू व इतर साथीचे आजार झाल्यामुळे त्यांची प्रकृती बरी नाही. विद्यापीठाचा सकारात्मक प्रतिसाद न आल्यास आम्ही विद्यार्थी आता आमरण उपोषण करु असा इशारा देण्यात आला आहे. बीए, बीएससी, बीकॉम शाखेंना विद्यापीठाने कॅरी ऑन दिले आहे. तसेच इंजीनियरिंग बी फॉर्म आणि लॉ याही शाखेला कॅरी ऑन देण्यात यावे, विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव करू नये. आमचे मूलभूत हक्क द्यावेत,संविधान नुसार 14 कायद्यासमोर समानतेचे उघड उल्लंघन विद्यापीठ करत आहे. असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. यासाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू जबाबदार राहतील. आठ दिवसापासून विद्यापीठात आंदोलन सुरू असून विद्यार्थ्यांकडून या ठिकाणी रोज लक्षवेधी घोषणाबाजी केली जाते.

 

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा