
(Mumbai )मुंबई-विरोधी पक्षांची आघाडी असलेल्या इंडिया नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स म्हणजेच इंडिया आघाडीची तिसरी बैठक आजपासून मुंबईत सुरु होत असून दोन दिवस (INDIA Alliance Meeting in Mumbai)चालणाऱ्या बैठकीत आघाडीचा संयोजक कोण (Convenor of Alliance) होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे. संयोजक पदासाठी सध्या (Sharad Pawar)शरद पवार, (Mallikarjun Kharge) मल्लिकार्जून खर्गे, (Nitish Kumar)नितीश कुमार, (Mamata Banerjee)ममता बॅनर्जी यांच्या नावांची चर्चा सुरु असून यापैकी प्रत्येक पक्षाकडून संयोजक पदासाठी लॉबिंग सुरु असल्याचे बोलले जात आहे.
दोन दिवस चालणाऱ्या या बैठकीला 28 पक्षांचे सुमारे 63 नेते आणि 6 मुख्यमंत्री उपस्थित राहणार असल्याचे शरद पवार यांनी काल सांगितले. बैठकीत इंडिया आघाडीच्या लोगोचे अनावरण करण्यात येणार आहे. मात्र, सयोजक कोण होणार, याची उत्सूकता अधिक आहे. बैठकीत जागावाटपावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. कोणता पक्ष, कुठून व किती जागांवर निवडणूक लढवणार यावरील निर्णय सर्वात आव्हानात्मक ठरणार आहे. आघाडीतील अनेक पक्ष राज्यांत एकमेकांच्या विरोधात आहेत.
आघाडीच्या संयोजक पदावर आज बैठकीत चर्चा होणार आहे. खरगे यांच्या नावाला ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल यांच्या सारख्या काही पक्षांचा विरोध आहे. तर काही पक्षांना काँग्रेसच्या नेत्याकडे हे पद देण्याची इच्छा नाही. त्यामुळे सर्वसमावेश नावाचा यासाठी विचार सुरू आहे. त्यामुळे शरद पवार हे पद घेणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
