
(Mumbai)मुंबई-इंडिया आघाडीचा संयोजक कोण होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून काँग्रेससह काही पक्ष आपला उमेदवार पुढे करण्याचा प्रयत्न करीत असल्याने या मुद्यावर मतैक्य होऊन संयोजकाची घोषणा आज होणार काय, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे. (Mallikarjun Kharge by Congress) काँग्रेसने मल्लिकार्जून खर्गे यांचे नाव पुढे केले आहे. (Convenor of India Alliance) तर त्याला डाव्यांनी विरोध केला आहे. दुसरीकडे (Mamata Banerjee)ममता बॅनर्जी आणि नितीशकुमार हे देखील या स्पर्धेत आहेत.
आपण संयोजक किंवा पंतप्रधान पदाच्या स्पर्धेत नसल्याचा दावा (Nitin Kumar) नितीन कुमार यांनी जाहीरपणे केला असला तरी त्यांच्या मुंबईतील समर्थकांकडून ‘ये देश मांगे नितीश’ची बॅनर्स झळकविण्यात आली आहेत. त्यामुळे नितीशकुमारही या स्पर्धेत असल्याचे मानले जात आहे. मल्लिकार्जून खर्गे यांचा अनुभव पाहता त्यांना संयोजक करावे, अशी सूचना काँग्रेसने केली आहे. त्यांना संयोजक केल्यास दलित मते आघाडीकडे वळविता येतील, असाही काँग्रेसचा दावा आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने संयोजक पद न घेता मोठे मन दाखवावे, असे मत कम्युनिस्ट पक्ष आणि इतर काही आघाडीतील पक्षांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे बैठकीत आज संयोजकाचे नाव निश्चित होणार का, याकडे लक्ष लागलेले आहे.
