बँक घोटाळा आरोपपत्रात अजित पवारांचे नाव वगळले

0
136

(Mumbai)मुंबई-महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्यात ईडीकडून दाखल पुरवणी आरोपपत्रात एकूण १४ जणांचा समावेश असून आरोपपत्रातून (Deputy Chief Minister Ajit Pawar)उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा यांचे नाव वगळण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

‘ईडी’ने या आठवडय़ात दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात (Prajakt Tanpure) प्राजक्त तनपुरे, (Prasad Tanpure) प्रसाद तनपुरे, (Subhash Deshmukh)सुभाष देशमुख, (Ranjit Deshmukh)रणजीत देशमुख, प्रसाद सागर, अलाईड अ‍ॅग्रो प्रॉडक्ट, तक्षशिला सिक्युरिटीज प्रा.लि., अर्जून खोतकर, समीर मुळय़े, जुगल तपाडिया, अर्जुन सागर इंडस्ट्रीज व तपाडिया कन्स्ट्रक्शन यांची नावे असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, अजित पवार व त्यांच्या पत्नी सुनेत्रा यांच्या नावाचा उल्लेख नसल्याचे सूत्रांनी सांगितले. प्राजक्त तनपुरे आणि प्रसाद तनपुरे हे शरद पवार गटाचे नेते आहेत. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे अर्जून खोतकर यांचेही नाव आरोपपत्रात आहे.

कारखाने कमी पैशात खरेदी करणे आणि विक्री प्रक्रिया अपेक्षेप्रमाणे न राबवणे हा मूळ ठपका ईडीने या प्रकरणात ठेवला होता. याप्रकरणात नेमकी काय कारवाई होते याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे. या प्रकरणात ऑगस्ट 2019 मध्ये मुंबई आर्थिक गुन्हे शाखेकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामुळे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हेही चांगलेच अडचणीत आले होते. 2010 मध्ये शिखर बँकने राम गणेश गडकरी साखर कारखाना विकला होता. साखर कारखान्याची विक्री किंमत 26 कोटी 32 लाख रुपये होती. असे असताना देखील हा कारखाना अवघ्या 12 कोटी 95 लाखांना विकण्यात आला होता. त्यामुळे या विक्री प्रकरणात अपेक्षित प्रक्रिया राबवली नसल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. यावेळी बँकेच्या संचालक पदी अजित पवार होते. यात ऑगस्ट 2019 मध्ये मुंबई आर्थिक गुन्हे शाखेकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर काही दिवसात या प्रकरणाचा तपास सक्तवसुली संचालनालयाकडे वर्ग करण्यात आला होता.

 

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा