इंडिया आघाडीच्या १३ सदस्य केंद्रीय समन्वय समितीची घोषणा

0
32

 

(Mumbai)मुंबई: इंडिया आघाडीने आज बैठकीच्या अखेरच्या दिवशी १३ सदस्यांच्या केंद्रीय समन्वय समितीची घोषणा केली. या समितीमध्ये प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांना स्थान देण्यात आले आहे. या बैठकीत ‘इंडिया’ आघाडीच्या लोगोचे अनावरण केले जाणार होते. मात्र, लोगो अनावरणाचा कार्यक्रम तूर्तास पुढे ढकललं आहे.
‘इंडिया’ आघाडीच्या समन्वय समितीत विविध पक्षातील या नेत्यांना स्थान देण्यात आलं आहे.
(K. C, Venugopal (Congress General Secretary))के. सी, वेणुगोपाल (काँग्रेसचे सरचिटणीस),
(Sharad Pawar (Nationalist Congress President)शरद पवार (राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष),
(M. K. Stalin (Chief Minister of Tamil Nadu))एम. के. स्टॅलिन (तामिळनाडूचे मुख्यमंत्री),
(Sanjay Raut (Shiv Sena, UBT)संजय राऊत (शिवसेना, यूबीटी),
(Tejashwi Yadav (RJD Leader and Deputy Chief Minister of Bihar)तेजस्वी यादव (आरजेडी नेते आणि बिहारचे उपमुख्यमंत्री),
(Abhishek Banerjee (Trinamool Congress General Secretary))अभिषेक बॅनर्जी (तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस),
(Raghav Chadha (AAP MP))राघव चढ्ढा (आपचे खासदार),
(Javed Khan (Socialist Party)जावेद खान (समाजवादी पक्ष),
(Lalan Singh (National President of Janata Dal United)लालन सिंग (जनता दल युनायटेडचे राष्ट्रीय अध्यक्ष),
(Hemant Soren (Chief Minister of Jharkhand)हेमंत सोरेन (झारखंडचे मुख्यमंत्री),
(D Raja (CPI)डी राजा (सीपीआय),
(Omar Abdullah (Leader of National Conference)ओमर अब्दुल्ला (नॅशनल कॉन्फरन्सचे नेते),
(Mehbooba Mufti (Head of Peoples Democratic Party))मेहबुबा मुफ्ती (पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या प्रमुख).
इंडिया’ आघाडीच्या बैठकीला संबोधित करताना (Congress National President Mallikarjun Kharge) काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर ‘सूडाचे राजकारण’ करत असल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, आघाडीची लोकप्रियता वाढत असल्याने सरकार विरोधी पक्षांच्या नेत्यांविरुद्ध तपास यंत्रणांचा दुरुपयोग करेल. देशातील शेतकरी, तरुण, महिला, उपेक्षित, मध्यमवर्ग, विचारवंत, स्वयंसेवी संस्था आणि पत्रकारांसह समाजातील प्रत्येक घटकाला भाजपाच्या हुकूमशाही राजवटीचा फटका बसला आहे, असा आरोपही खरगे यांनी केला.

 

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा