‘एक देश, एक निवडणूक’ साठी केंद्राची समिती

0
51

(New Dellhi)नवी दिल्ली-देशात एकत्रित निवडणुका शक्य व्हाव्यात, यासाठी केंद्र सरकारने पावलं टाकली आहेत. एक देश-एक निवडणूक ही संकल्पना देशात राबविण्यासाठी केंद्र सरकारने (Former President Ram Nath Kovind)माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. (One Nation, One Election) १८ सप्टेंबरपासून पाच दिवसांचे संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. या अधिवेशनात यासंदर्भातील विधेयक येण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.

ही समिती वन नेशन वन इलेक्शनच्या संदर्भातीलकायदेशीर बाबी तपासणार आहे. यासोबतच सर्वसामान्यांचे मतही घेतले जाणार आहे. दरम्यान, काँग्रेसने सरकारच्या निर्णयाला विरोध केला आहे. सरकारला अचानक एक देश एक निवडणुकीची गरज का पडली? असा सवाल लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार (Adhir Ranjan Chaudhary)अधीर रंजन चौधरी यांनी उपस्थित केलाय. हे अधिवेशन जुन्या संसद भवनापासून सुरू होऊन नव्या सभागृहात संपेल, असे मानले जात आहे.

 

 

 

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा