
(Nagpur) नागपूर – (Adani ICD Borkhedi)अदानी आयसीडी बोरखेडी, नागपूर येथे रेकची पहिली निर्यात पहायला मिळाली. जी अदानी समूहाच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरली. मध्य भारतातील आंतरराष्ट्रीय व्यापार आणि जागतिक कनेक्टिव्हिटीच्या दिशेने प्रवासाची ही महत्वाची सुरुवात असून हा कार्यक्रम आर्थिक वाढ, रोजगार निर्मिती आणि तंत्रज्ञान व्यवस्थापनाच्या संधी उघडणारा आहे. सध्या अदानी आयसीडी नागपूर सर्वोत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधा आणि अत्यंत अनुभवी मनुष्यबळाच्या मदतीने EXIM आणि देशांतर्गत सेवा, वेअरहाऊस सुविधा, फर्स्ट आणि लास्ट माइल डिलिव्हरी प्रदान करत आहे.
गुरुवार 31 ऑगस्ट रोजी कॉर्डेलिया कंटेनर शिपिंग लाइन, स्पीडवेज लॉजिस्टिक्स, पुथरण लॉजिस्टिक आणि आकाश इंडस्ट्रीज यांच्या सहाय्याने पहिल्या निर्यात रेकचे उद्घाटन सहाय्यक आयुक्त कस्टम यांच्या उपस्थितीत झाले. अनिल गोस्वामी आणि कस्टम अधिकारी यांच्या उपस्थितीत झालेले हे उद्घाटन शिपमेंट अदानी समूहाच्या राष्ट्र उभारणीच्या मूलभूत मूल्यांना चालना देणार्या अन्वेषण आणि उपक्रमाच्या भावनेला मूर्त रूप देणारेच म्हणता येईल.
