ज्‍येष्‍ठ नागरिक विरंगुळा केंद्राचे थाटात उद्घाटन

0
81

(nagpur)नागपूर, 31 ऑगस्‍ट
ज्‍येष्‍ठ नागरिक मंडळ हनुमाननगर आणि ज्येष्ठ नागरिक महामंडळ विदर्भ यांच्या संयुक्‍त विद्यमाने ज्‍येष्‍ठ नागरिकांच्‍या हिताचे विविध उपक्रम राबविण्‍यासाठी नागपूर महानगरपालिकेने उपलब्‍ध करून दिलेल्‍या समाजभवनामध्‍ये स्थापन करण्यात आलेल्या ज्‍येष्‍ठ नागरिक विरंगुळा केंद्राचे उद्घाटन 95 वर्षीय योगतज्ञ विठ्ठलराव जिभकाटे यांच्या हस्ते गुरुवारी करण्‍यात आले आहे.

चौकोनी मैदान स्थित हनुमाननगर येथील, एसटी व्यायाम शाळा परिसरात पार पडलेल्या कार्यक्रमाला (South BJP president Deven Dasture)दक्षिण भाजप अध्यक्ष देवेन दस्तुरे, (Engineer and social activist Parag Pandharipande)अभियंते व सामाजिक कार्यकर्ते पराग पांढरीपांडे, (Dyaneshwar Balpande)ज्ञानेश्र्वर बालपांडे, (President of Senior Citizens Corporation Vidarbha Prof. Prabhuji Deshpande) ज्‍येष्‍ठ नागरिक महामंडळ विदर्भचे अध्‍यक्ष प्रा. प्रभुजी देशपांडे, सचिव अॅड. अविनाश तेलंग, हनुमाननगर ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्‍यक्ष भगवान मुंढे, सचिव मोहन झरकर यांची उपस्थिती होती. यावेळी विठ्ठलराव जिभकाटे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.

ज्‍येष्‍ठ नागरिक विरंगुळा केंद्राचा उपयोग आरोग्य, कायदा, आर्थिक, शासकीय समस्यासंदर्भात ज्येष्ठांना मार्गदर्शन करण्याकरिता होणार आहे, ही अतिशय उत्तम बाब आहे. ज्येष्ठ नागरिकांचा जीवनानुभव खूप मोठा असतो. त्यांच्या अनुभवाचा उपयोग तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठीदेखील व्हावा, अशी अपेक्षा देवेन दस्तुरे यांनी व्यक्त केली. पराग पांढरीपांडे यांनी केंद्राला शुभेच्छा दिल्या. अध्यक्षस्थानावरून बोलताना प्रभुजी देशपांडे यांनी या विरंगुळा केंद्रामुळे ज्येष्ठ नागरिकांचे शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील असे सांगितले. येथे कुटुंब प्रबोधनाचे कार्यक्रम घेण्यात यावे, असे ते म्हणाले अविनाश तेलंग यांनी प्रास्ताविकातून केंद्रातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची तसेच ज्येष्ठांच्या समस्या सोडविण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.

सुरुवातीला मंडळाचे सदस्य लक्ष्मीकांत तुळणकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सूत्रसंचालन मोनिका वारोतकर यांनी केले तर भगवान मुंढे यांनी आभार मानले.

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा