माध्यमांनी राष्ट्रनिर्मितीसाठी पुढे यावे ! सरसंघचालक डॉ .मोहन भागवत

0
50

(Nagpur)नागपूर :
श्री नरकेसरी प्रकाशन लिमिटेड द्वारे संचालित दैनिक तरुण भारतच्या हिंगणा एमआयडीसी स्थित परिसरात निर्मित ‘मधुकर भवन’ या नव्या इमारतीचं लोकार्पण (Sarsangchalak of Rashtriya Swayamsevak Sangh Dr. Mohan Bhagwat)राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते गुरुवारी पार पडलं. कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष उपस्थिती होती. (Mr. Chairman of Narkesari Prakashan Limited Dr. Vilas Dangre) श्री. नरकेसरी प्रकाशन लिमिटेडचे अध्यक्ष डॅा. विलास डांगरे, (Working President Anil Dandekar)कार्याध्यक्ष अनिल दांडेकर आणि ( Dhananjay Bapat)प्रबंध संचालक धनंजय बापट यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी माध्यमांनी राष्ट्रनिर्मितीसाठी पुढे येण्याचं आवाहन केलं. देशाला जागतिक सत्ता बनविण्यासाठी समाजाची बांधणी करण्याचं उद्दिष्ट बाळगण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. दैनिक ‘तरुण भारत’ने 98 व्या वर्षात पदार्पण केलं आहे. यानिमित्त संपादकीय व व्यवस्थापन क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणा-या मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यात (Bhaiyyasaheb Mundle)भैय्यासाहेब मुंडले, (Udayabhaskar Nair)उदयभास्कर नायर, (Anil Dandekar)अनिल दांडेकर, (Vishwas Pathak)विश्वास पाठक, (Laxman Rao Joshi) लक्ष्मणराव जोशी, (Sudhir Pathak)सुधीर पाठक यांचा सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, (Union Minister Nitin Gadkari)केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व (Deputy Chief Minister Devendra Fadnavis)उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

 

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा