लकवापिडीत महिलेची रहस्यमय हत्या

0
38

(Nagpur)नागपूर : यशोदरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संजय गांधीनगर गोंड मोहल्ल्यात एका ५० वर्षीय लकवापिडीत महिलेचा रहस्यमरित्या खून करण्यात आल्याच्या घटनेने मोठी खळबळ उडालेली आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास उजेडात आली. (Durga Ratan Meshram)दुर्गा रतन मेश्राम, असे मृत महिलेचे नाव आहे. ही महिला आपला मुलगा अंकित मेश्राम याच्यासोबत राहत होती. ती लकवापिडीत होती. तिला मधुमेह आणि रक्तदाबाचा आजारही होता. त्यामुळे तिला धड बोलताही येत नव्हते. याच मोहल्ल्यात तिची मुलगी (Priya Shailesh Dhanvijay) प्रिया शैलेश धनविजय (३२) ही राहते. वस्तीतच राहणारा तन्या तरवाडे (२०) नावाचा मुलगा तिच्याकडे आला. त्याने तुमची आई मरण पावल्याचे सांगितले. लागलीच ती आणल्या पतीसोबत आईच्या घरी गेली असता तिचा भीषण खून झाल्याचे दिसले. दुर्गाच्या गालावर आणि गळ्य शस्त्राच्या जखमा होत्या. कुण्या तरी अनोळखी इसमाने हा खून केला आणि तो बेपत्ता झाला.

प्रिया धनविजय हिच्या तक्रारीवरून यशोदरानगर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपीचा कसून शोध घेत आहेत.

 

 

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा