ठाकरे गटाच्या नेत्याची मुंबईत आत्महत्या

0
38

(mumbai)मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते व (Former Councilor Sudhir More)माजी नगरसेवक सुधीर मोरे यांनी लोकल ट्रेनपुढे उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. (Shiv Sena UBT Leader Suicide) त्यांच्या आत्महत्येमुळे खळबळ माजली असून त्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

घाटकोपर रेल्वे स्टेशनजवळ रुळावर त्यांचा मृतदेह आढळला. मृतदेहाचे अनेक तुकडे झाले होते. रात्री त्यांना एक फोन आला आणि मी एका वैयक्तिक कामानिमित्त जात आहे, असे त्यांनी आपल्या खासगी सुरक्षारक्षकाला सांगितले व ते घाईत घराबाहेर पडले होते. गाडी न घेता ते रिक्षाने गेले. मात्र घाटकोपर आणि विद्याविहारच्या दरम्यान असलेल्या पुलाखाली ते गेले. तेथे साडे अकराच्या दरम्यान ते रुळावर झोपले. त्याचवेळी लोकल ट्रेनच्या मोटरमनने कोणीतरी ट्रॅकवर झोपल्याचे पाहून वेग कमी करण्याचा प्रयत्नही केला. मात्र वेगात असलेली लोकल त्यांच्या अंगावरुन गेली आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला. काही महिन्यांपासून त्यांना ब्लॅकमेल केले जात होते व त्यातून त्यांनी आत्महत्या केली असावी, असा दावा त्यांच्या निकटवर्तीयांकडून केला जात आहे. सुधीर मोरे यांच्याकडे रत्नागिरी जिल्ह्याचे संपर्कप्रमुख म्हणूनही जबाबदारी होती.

 

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा