व्यावसायिक सिलिंडरची किंमतही १५८ रुपयांनी कमी

0
28

(New Dellhi)नवी दिल्ली : घरगुती वापरच्या गॅस सिलिंडरच्या किमती दोनशे रुपयांनी कमी झालेल्या असताना आता केंद्र सरकारने व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीतही कपात केली आहे. व्यावसायिक सिलिंडरची किंमत १५८ रुपयांनी कमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. (Commercial LPG Gas Cylinder Price) तीन दिवसांपूर्वी सरकारनं घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतींमध्ये 200 रुपयांची कपात केली होती. एलपीजी सिलेंडरचे नवे दर आजपासून लागू करण्यात आले आहेत. आता त्याचसोबत व्यावसायिक वापराच्या सिलिंडरवरही ग्राहकांना दिलासा देण्यात आला आहे.
19 किलोग्रॅमच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 158 रुपयांनी कमी झाली आहे. तेल कंपन्यांच्या माहितीनुसार, मुंबईत व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 1482 रुपये आणि चेन्नईमध्ये 19 किलो एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत 1695 रुपये झाली आहे. मुंबईत घरगुती सिलेंडरची किंमत 902.50 रुपये प्रति सिलेंडर आहे. उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत 75 लाख भगिनींना मोफत गॅस कनेक्शन मिळणार आहेत. त्यासाठी त्यांना एक रुपयाही द्यावा लागणार नाही. पाईप, स्टोव्ह आणि सिलेंडरही मोफत मिळणार आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा