नवीन चंद्रपूरच्या विकासकामांना गती द्या

0
25

 -वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

(Nagpur)नागपूर : चंद्रपूर शहरालगतच्या ‘नवीन चंद्रपूर’ या भागातील प्रलंबित विकासकामांना गती देण्याकरिता या भागातील बसस्थानक, पोलिस स्टेशन, पोस्ट ऑफिस,रस्त्यांची दुरुस्ती, वीजपुरवठा यासारख्या पायाभूत सुविधांचे नियोजन करून त्याच्या अंमलबजावणीची गरज आहे. सर्व सोयीसुविधायुक्त एक आदर्श शहर कसे उभे करता येईल, याकडे जिल्हा प्रशासन व विशेष नियोजन प्राधिकरण असलेल्या महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने (म्हाडा) विशेषत्वाने लक्ष द्यावे, असे निर्देश (Forest and Cultural Affairs Minister Sudhir Mungantiwar)वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

नवीन चंद्रपूर भागात जिल्हा प्रशासन तसेच म्हाडातर्फे करण्यात येत असलेल्या विविध विकासकामांचा तसेच प्रलंबित विषयांचा आढावा मुनगंटीवार यांनी सेमिनरी हिल्स येथील हरीसिंग नाईक सभागृहात घेतला. बैठकीला म्हाडाचे उपाध्यक्ष तथा (Chief Executive Officer Sanjeev Jaiswal)मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, (Chandrapur Collector Vinay Gowda)चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा, (Chandrapur Municipal Commissioner Vipin Paliwal)चंद्रपूर महानगरपालिका आयुक्त विपीन पालिवाल यांच्यासह चंद्रपूर जिल्ह्यातील विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात यावी. दरमहा या समितीने विकासकामांचा आढावा घ्यावा. चंद्रपूर शहरालगत असलेल्या या भागात एक चांगल्या दर्जाचे सांस्कृतिक सभागृह, ॲम्फीथिएटर, ई-लायब्ररीचे (अभ्यासिका) नियोजन करीत आराखडा तयार करण्यात यावा. भूसंपादनाच्या प्रलंबित कामांना गती द्यावी. चंदीगढसारखे एक सुनियोजित व चांगल्या दर्जाचे शहर कसे उभे करता येईल, याकडे कार्यान्वयन यंत्रणेने लक्ष देण्याची गरज असल्याचे मुनगंटीवार यावेळी म्हणाले. म्हाडाने पाणी कर कमी करावा, अशी सूचना केली.म्हाडातर्फे सादरीकरण करण्यात आले.

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा