राष्ट्रवादी काँग्रेसच्या विदर्भ मेळाव्यात अनेकांना नियुक्तीपत्रे

0
44

देशपातळीवर मोदींना पर्याय नाही, विरोधकांची अनैतिक आघाडी-खा प्रफुल्ल पटेल ( Praful Patel)

(Nagpur)नागपूर – देशपातळीवर नेतृत्व म्हणून (Prime Minister Narendra Modi) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्याय नाही, केवळ मोदी विरोधासाठी एकत्र आलेल्या विरोधकांची विस्कळीत आघाडी त्यांचा मुकाबला करू शकणार नाही, केवळ फोटोसेशनपुरत्याच बैठका आहेत. साधे एकमताने लोगोचे अनावरण होऊ शकत नाही, देश जुळणारच नाही तर जिंकणार कसा ? असा सवाल उपस्थित करतानाच डाव्या, उजव्यांची ही अनैतिक आघाडी असल्याचे टीकास्त्र आज (NCP National Working President MP Praful Patel)राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सोडले. नागपूर व विदर्भातील नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत होऊ दिली नाही असे ताशेरे ओढले. जे आपल्यासोबत आले नाहीत त्यांची चिंता करू नका, आजवर काँग्रेसशी आघाडी करून लढताना आपला पक्ष मजबूत होऊ शकला नाही. आता चिन्ह, झेंडा आपल्याकडे असून नागपूरच नव्हे तर विदर्भात पक्ष मजबूत केला जाईल. आपल्या कार्यकर्त्यांना निवडणुकीत संधी दिली जाईल असा शब्दही त्यांनी यावेळी दिला. मोठ्या प्रमाणावर आज पक्षप्रवेश झाले त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली. डॉ वसंतराव देशपांडे सभागृहात शनिवारी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात प्रफुल पटेल बोलत होते. यावेळी व्यासपीठावर (Food Supply Minister Dharmarao Baba Atram)अन्न पुरवठा मंत्री धर्मराव बाबा आत्राम, आ राजेंद्र जैन, (City President Prashant Pawar)शहराध्यक्ष प्रशांत पवार, प्रदेश उपाध्यक्ष अनिल अहिरकर, जिल्हा ग्रामीण अध्यक्ष बाबा गुजर, आभा पांडे, श्रीकांत शिवणकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा