चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प तातडीने पूर्ण करा

0
35

– सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar)

(Nagpur )नागपूर – (Chandrapur)चंद्रपूर व (Gadchiroli) गडचिरोली जिल्ह्यातील प्रलंबित असलेल्या विविध सिंचन प्रकल्पांची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सिंचन विभागाला दिल्या.
चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील जलसंपदा, जलसंधारण व मत्स्यव्यवसाय विभागांच्या प्रश्नांबाबत येथील हरीसिंग नाईक सभागृहात आयोजित बैठकीत मुनगंटीवार बोलत होते. अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक नरेश झुरमुरे, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय मीणा, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता पद्माकर पाटील, मृदू व जलसंधारणचे अधीक्षक अभियंता नितीन दुसाने, मत्स्य व्यवसाय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त सुनील जांभुळे बैठकीला उपस्थित होते.

वनबाधित सिंचन प्रकल्पात येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी सिंचन व वनविभागाने विशेष बैठक घेवून वेगाने पूर्ण होऊ शकणाऱ्या निवडक प्रकल्पाची यादी तयार करावी व त्यासाठी निधी मागणीचा प्रस्ताव सादर करावा. वन कायद्यामुळे 1983 पासून प्रलंबित असलेल्या ताडोबा वनक्षेत्रातील हुमान नदी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सध्याच्या परिस्थितीनुसार झालेला बदल लक्षात घेता या सिंचन प्रकल्पामुळे वन्यप्राण्यांच्या भ्रमण मार्गात खरोखरच अडचण येते का, यासंबंधीची तपासणी करण्यासाठी अभ्यास समिती नेमण्याबाबत शासनाकडे शिफारस करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
नागपूर विभागात नवीन सिंचन प्रकल्पांना मान्यता मिळण्यासाठी सिंचन अनुशेष तपासणीतील माजी मालगुजारी (मामा) तलाव यादीतून वगळण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणे अवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
चंद्रपूर जिल्ह्यातील 1678 पैकी 1100 मामा तलाव व गडचिरोली जिल्ह्यातील 1603 पैकी 475 मामा तलावांचा दुरुस्ती कार्यक्रम राबवण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा. दृष्काळसदृश परिस्थिती टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनावर राखीव जिल्हा नियोजनचा पाच टक्के निधी मामा तलावांच्या दुरूस्तीसाठी वापरण्याचे त्यांनी सांगितले.

चंद्रपूर जिल्हा मत्स्यव्यवसायाठी मॉडेल जिल्हा म्हणून विकसित करावयाचा आहे. यासंबंधात विशेष बैठक घेण्याचे त्यांनी सांगितले. मृद जलसंधारण महामंडळांतर्गत दोन्ही जिल्ह्यातील सुरू असलेले व प्रस्तावित कामांचा त्यांनी आढावा घेतला. चंद्रपूर जिल्ह्यात 151 योजनांच्या कामांमधून 11 हजार 658 हेक्टर सिंचन क्षेत्र निर्माण होणार असून गडचिरोली जिल्ह्यात 156 कामांतून सहा हजार 726 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल, अशी माहिती नितीन दुसाने यांनी सादर केली.
चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील बांधकामाधिन दिंडोरा बॅरेज, बेंडारा मध्यम प्रकल्प, हल्दी पुरानी, डोंगरगाव, कोटगल बॅरेज, तळोधी मोकासा, चिंचडोह बॅरेज, कोटगल उपसा सिंचन तसेच वनबाधीत प्रकल्पांतर्गत हुमन, तुलतुली ,चेन्ना नदी,कारवाफा, उमीनाला, डुरकानगुड्रा पुलखल आदी प्रकल्पांचा त्यांनी आढावा घेतला.

 

 

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा