
– अनिल देशमुख (Anil Deshmukh)
(Nagpur)नागपूर – जालनामध्ये अमानुष पध्दतीने मराठा आंदोलकांवर अमानुष लाठीचार्ज करण्यात आला त्याचा निषेध करतो. आतापर्यंत मराठा मोर्चे निघाले, शांततेच्या मार्गाने मोर्चे झाले. हाही शांतपणे मोर्चा होता. मात्र, पोलिसांनी लाठीचार्ज केला.लाठीचार्जचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले असतील असे मत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केले आहे.
देशमुख म्हणाले, राज्य सरकारने मराठा समाजाच्या किती मागण्या पूर्ण केल्या? हे पुढं आलं पाहिजे, गृहमंत्री यांनीच आदेश दिला असेल. मात्र, का आवश्यकता पडली लाठीचार्ज करण्याची? दीड वर्षात सरकारने मराठा समाजासाठी काहीही केले नाही. मराठा समाजाचे किती आश्वासन पूर्ण केले? ते सरकारने सांगावे. मुळात हे संपूर्ण प्रकरण पोलिसांना शांततेत हाताळता आले असते अशी माझी माहिती आहे. आता गृहमंत्री यांनी जबाबदारी घ्यावी असेही देशमुख माध्यमांशी बोलताना म्हणाले.
