
– ज्येष्ठ साधकांनी व्यक्त केले मत
– शाबरी कवच सहस्त्रावर्तन सोहळा संपन्न
(Nagpur)नागपूर,
साधनं अनेक असली तरी साध्य एकच असणे अर्थात विविध भक्तीमार्गांनी एकाच परमशक्तीची कृपा प्राप्त करणे म्हणजेच आध्यात्मिक साधना! जीवनात पुढे चालत राहणे म्हणजेच कर्मयोग असल्याचे सांगून, ही साधना करण्यासाठी प्रपंचात राहूनच कर्मयोगाचे आचरण करणे हीदेखील आध्यात्मिक साधना असल्याचे मत ज्येष्ठ साधकांनी व्यक्त केले. श्री मुकुंद दादा अंधारे नवनाथ शक्तीपीठ ट्रस्टच्या वतीने आयोजित, शाबरी कवच सहस्त्रावर्तन सोहळ्यात झालेल्या आध्यात्मिक चर्चेचा हा परिपाक ठरला.
वर्धा रोडवरील विकासाश्रम येथे झालेल्या शाबरी कवच सहस्त्रावर्तन सोहळ्यात नाथ संप्रदायाचे ज्येष्ठ उपासक (Laxmikant Deshpande)लक्ष्मीकांत देशपांडे आणि नाथ संप्रदायातील उपासनेचे मार्गदर्शक मुकुंद दादा अंधारे यांनी कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित होते. ‘विज्ञानाची परमोच्च अवस्थाङ्क म्हणजे अध्यात्म असल्याचे सांगून, (Mukund Dada Andhare)मुकुंद दादा अंधारे यांनी या परमोच्च अवस्थेच्या प्राप्तीसाठीच भक्तीमार्ग असल्याचे मार्गदर्शन केले. आपले विचार मांडताना, उभय विचारवंतांनी स्वानुभव सांगून उपस्थितांना मार्गदर्शन केले. सामान्य संसारी माणसाला दैनंदिन जीवनात येणाèया समस्यांना तोंड देण्यासाठी क्षमता विकसित करण्यासह दिशादर्शन करण्याचे कार्य श्री नवनाथांच्या उपासनेतून साधत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते ‘किमयाङ्क या पूर्णत: नाथ संप्रदायाला समर्पित विशेषांकाचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यंदा हा विशेषांक डिजीटल स्वरूपात प्रकाशित करण्यात आला असून, तो भाविकांना नि:शुल्क उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यानंतर, भाविकांनी श्री शाबरी कवचाचे सामूहीक पठण केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन (Smita Deshmukh)स्मिता देशमुख यांनी तर आभार प्रदर्शन (Shraddha Vaidya)श्रद्धा वैद्य यांनी केले. त्यासोबतच, नवनाथ शक्तीपीठ ट्रस्ट आणि विकासाश्रम ट्रस्टचे पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने भाविकांची यावेळी उपस्थिती होती. महाआरती आणि महाप्रसादाने आयोजनाचा समारोप झाला.