वन नेशन, वन इलेक्शनला विरोध नाही, पण….

0
36

 

– नाना पटोले ( Nana Patole)

(nagpur)नागपूर : वन नेशन, वन इलेक्शन या नव्या निर्णयाचे समर्थन करण्यास हरकत नाही. पण निष्पक्षपातीपणे निवडणुका झाल्या पाहिजेत, बॅलेटवर निवडणुका व्हाव्यात अशी मागणी (Congress state president Nana Patole)काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज केली. पटोले म्हणाले, संविधानाचा अवमान, लोकशाहीचा खून हे सरकार करत आहे, मूठभर धनदांडग्यासाठी सामान्यांचा गळा कापण्याचे पाप हे भाजप सरकार करत आहे. मराठा समाजावरील पोलिस लाठीमार संदर्भात बोलताना इंडिया, काँग्रेसच्या बैठकीच्या निमित्ताने हे सारे घडवले गेले. गृहमंत्री यांच्या आदेशाने झालेल्या लाठीचार्जचा निषेध करतो, हे सुलतानी सरकार आहे, स्वतःसाठी जगणारे सरकार आहे, लोकशाहीचे खच्चीकरण करण्याचे काम करत आहे, मराठा आणि धनगर समाजाला आरक्षणाचे गाजर दाखवले. त्यावेळी सुप्रीम कोर्टान फटकारले, उपोषण मंडपावर लाठीचार्ज होणं, हे दुर्दैवी आहे, पहिल्यांदा महाराष्ट्रात झाल आहे. (Rahul Gandhi)राहुल गांधी यांचे जोरदार भाषण होत असताना लाठीचार्ज करण्याचे पाप केले. वृद्ध, लहान मुलांवर लाठीचार्ज झाला,स्वतः सरकारने राजीनामा दिला पाहिजे, जनता माफ करणार नाही. महाराष्ट्राची संस्कृती संपवण्यासाठी प्रयत्न सरकार करत आहे. मात्र, हा प्रयत्न यशस्वी होणार नाही. मराठा समाजाला न्याय देण्यासाठी कॉंग्रेस भूमिका निभावेल, राष्ट्रीय जनगणना करण्याची मागणी पटोले यांनी केली. उद्यापासून काँग्रेसचे जनसंवाद अभियान, पदयात्रा सुरू होत असून यानिमित्ताने या सत्ताधाऱ्याना बाहेर काढण्याचा संकल्प घेतला जाईल, हे सरकारं स्वतः भ्रष्टाचार करून परिवार वाद करण्याचा आरोप कॉंग्रेसवर करत आहे. इंडिया आघाडीची बैठक असल्याने सरकारने हे केले. 24 तासात आरक्षण आणून देण्याची फडणवीस बतावणी करत होते. सर्व उलट्या चोराच्या बोंबा आहेत, फडणवीस सांगत होते, आम्ही वीज बिल माफ करू, आता दीड वर्ष लोटून काहीच केले नाही. मंत्रिमंडळ विस्तार करू शकले नाही, भाजप सत्तेत बसून राजकारण करत आहे.

(Satyapal Malik)सत्यपाल मलीक यांनी देशातील जनतेपुढे सत्य सांगितले आहे.
उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या आरोपाला उत्तर देताना, आगीत तेल टाकण्याचे काम काँग्रेस करत नाही, तर भाजपचे हे काम आहे, तेल टाकणारे लोक सत्तेत बसले आहेत असा पलटवार केला.
नियमित अधिवेशन आताच संपलं. पंतप्रधान यांच्याकडे मणिपूरवर बोलण्यासाठी वेळ नाही. जुमलेबाज सरकार आहे, वेळेवर काहीही करतील, निवडणुका लावतील, लोकांनी यावर विश्वास ठेवू नये, दुष्काळी स्थिती, शेतकरी संकटात आहे. पिण्याच्या पाण्याचे प्रश्न आहेत. दुष्काळ परिस्थिती असताना केंद्रातील सरकार यावर बोलायला तयार नाही, हे जुमलेबाज सरकार आहे.

 

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा