आष्टी तालुक्यातील अंगणवाडीत निकृष्ट दर्जाचा पोषण आहार

0
24

 

(Wardha)वर्धा – वर्ध्यात स्तनदा माता पोषण आहारात येणाऱ्या गव्हाच्या पॅकेटमध्ये बुरशी आणि जाळे लागलेले गहू आल्याने खळबळ उडाली आहे. आष्टी तालुक्यातील तळेगाव श्यामजी पंत येथे एका अंगणवाडी मधून हे गहू वितरित करण्यात आले. लाभार्थ्यांने गहू घरी आणून पॅकेट उघडल्यावर मात्र गव्हाला दुर्गंधी सुटली होती. गहू असलेल्या पॅकेटमध्ये बुरशी आणि जाळे लागलेले गहू असल्याने पोषण आहाराचा दर्जा इतका निकृष्ट कसा? असाच प्रश्न उपस्थित झाला आहे. तळेगाव श्यामजी पंत येथील अंगणवाडी क्रमांक 36 मध्ये स्तनदा मातेचा आहार घेण्यासाठी गेलेल्या एका मातेला देण्यात आलेला गहू अत्यंत निकृष्ट दर्जाचा आहे. गव्हाला दुर्गंधी सुटली असून गव्हामध्ये मोठ्या गाठी बनलेल्या आढळून आल्या. सोबतच हा गहू पूर्णतः काळा पडला आहे. वारंवार पोषण आहाराचे साहित्य हे निकृष्ट दर्जाचे येत असून वारंवार वरिष्ठांना सूचना देऊनही यावर कोणतीच कारवाई होत नाही. स्तनदा मातेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी देण्यात आलेल्या निकृष्ट आहारावर आता प्रश्न उपस्थित केला जात आहे.

 

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा