ज्‍येष्‍ठ नागरिकांचे स्‍नेहम‍िलन 5 सप्‍टेंबर रोजी

0
62

डॉ. मोहनजी भागवत यांचे मार्गदर्शन

(NAGPUR)नागपूर, 2 सप्‍टेंबर
ज्‍येष्‍ठ नागरिक महामंडळ विदर्भच्‍यावतीने ज्‍येष्‍ठ नागरिकांचे स्‍नेहम‍िलन मंगळवार, 5 सप्‍टेंबर 2023 रोजी दुपारी 4.30 वाजता कविवर्य सुरेश भट सभागृह, रेशीमबाग येथे आयोज‍ित करण्‍यात आले आहे. या कार्यक्रमाला (Sarsangchalak of National Volunteer Union Dr. Mohanji Bhagwat)राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

शिक्षक दिनाचे औचित्‍य साधून आयोजित करण्‍यात आलेल्‍या या कार्यक्रमात सामाजिक बांधिलकी जपत विशेष योगदान देणा-या ज्‍येष्‍ठ शिक्षक व शिक्षिकांचा सत्‍कार केला जाणार आहे. तत्‍पूर्वी, दुपारी 3 वाजता ‘ज्‍येष्‍ठांनो, निर्भयपणे आणि तारतम्‍याने जगा’ असा संदेश देणारी ‘हे गेले’ ही विनोदी एकांकिका सादर केली जाईल. संजय भाकरे फाउंडेशन निर्मित या एकांकिकेचे लेखन (Yogesh Soman)योगेश सोमण यांचे असून दिग्‍दर्शन (Ajay Ghare)अजय घारे यांचे आहे. सूत्रधार (Shekhar Mangalmurthy)शेखर मंगलमूर्ती हे आहेत. (Shraddha Telang)श्रद्धा तेलंग, (Kalyani Telang)कल्‍याणी तेलंग, (Sanchita Puntambekar)संचिता पुणतांबेकर, (Mrinalini Paunikar)मृणालिनी पौनीकर, (Anjali Joshi)अंजली जोशी, (Namita Gondhlekar)नम‍िता गोंधळेकर, (Prajakta Gokhale)प्राजक्‍ता गोखले, (Shreya Karandikar) श्रेया करंदीकर या कलाकारांचा यात सहभाग आहे.

या कार्यक्रमाला मोठ्या संख्‍येने उपस्‍थ‍ित राहावे, असे आवाहन ज्‍येष्‍ठ नागरिक महामंडळ विदर्भचे अध्‍यक्ष प्रा. प्रभूजी देशपांडे, सचिव अॅड. अविनाश तेलंग, हेमंत शिंगोडे, विनोद व्‍यवहारे, मामा मुंढे, मोहन झरकर आदींनी केले आहे.

 

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा